वरंधा घाटचा रक्षक अपरिचित कावळ्या किल्ला
सह्याद्रीत खूप प्रमाणात दुर्लक्षित किल्ले आहेत... नेहमीच्या किल्ल्याच्या भटकंती टाळून अश्या अडवाटेवरच्या किल्ल्यांची भेट घेत दुर्गजागर राबता ठेवायला हवा... असाच एक किल्ला आहे कावळ्या किल्ला जो ब्रिटिशांनी विभाजुन कोकणात उतरण्या करता (भोर-महाड)वरंधा घाट तयार केला आहे...हा किल्ला करायचा असेल तर अर्धा दिवस सुद्धा पुरतो.. घाटा मुळे किल्ल्याचे विभाजन उत्तर व दक्षिण बाजू अशी झाली आहे. वरंधाच्या पवार हॉटेल पासून ५ मिनिटे डाम्बरी रस्त्याने चालल्यावर एक वाट डावी कडे वळते आणि झाडीत शिरते... पुढे चालून गेलं की सपाटी मैदानावर ८ खांब टाक्याचा समूह आहे. जनावरांना पिण्याकरता चर खोदला आहे.पुढे चालत गेल की गडाची वाघजाई देवी मंदिर व दगडात कोरलेलं पाण्याचं भांड लागते.मंदिराची डाग डुजी करून tiles बसवले आहेत.अजून थोडं पुढं गेलं की दक्षिण बाजूचे शेवटचे टोक लागते,उत्तर बाजूचे किल्ल्याचे व वरंधा घाट चे सुंदर दृश्य इथून दिसते,इथून खाली उतरण्या करता दक्षिण बाजूला पाहिऱ्...