वरंधा घाटचा रक्षक अपरिचित कावळ्या किल्ला
सह्याद्रीत खूप प्रमाणात दुर्लक्षित किल्ले आहेत...
नेहमीच्या किल्ल्याच्या भटकंती टाळून अश्या अडवाटेवरच्या किल्ल्यांची भेट घेत दुर्गजागर राबता ठेवायला हवा... असाच एक किल्ला आहे कावळ्या किल्ला जो ब्रिटिशांनी विभाजुन कोकणात उतरण्या करता (भोर-महाड)वरंधा घाट तयार केला आहे...हा किल्ला करायचा असेल तर अर्धा दिवस सुद्धा पुरतो.. घाटा मुळे किल्ल्याचे विभाजन उत्तर व दक्षिण बाजू अशी झाली आहे.
वरंधाच्या पवार हॉटेल पासून ५ मिनिटे डाम्बरी रस्त्याने चालल्यावर एक वाट डावी कडे वळते आणि झाडीत शिरते... पुढे चालून गेलं की सपाटी मैदानावर ८ खांब टाक्याचा समूह आहे. जनावरांना पिण्याकरता चर खोदला आहे.पुढे चालत गेल की गडाची वाघजाई देवी मंदिर व दगडात कोरलेलं पाण्याचं भांड लागते.मंदिराची डाग डुजी करून tiles बसवले आहेत.अजून थोडं पुढं गेलं की दक्षिण बाजूचे शेवटचे टोक लागते,उत्तर बाजूचे किल्ल्याचे व वरंधा घाट चे सुंदर दृश्य इथून दिसते,इथून खाली उतरण्या करता दक्षिण बाजूला पाहिऱ्या वळवून वाट तयार केली आहे,जुनी वाट असल्याने पुढे झाडी माजली आहे पुढे जाता येत नाही.आल्या वाटेने पुन्हा फिरून घाट रस्त्याच्या डांबरी रोड ला लागायचे.
खिंडीतून किल्ल्याच्या उत्तर भागावर जाता येते,सपाटी भागावर ९-१० पाहिऱ्या चढून गेलं की कातळ उजवी कडे ठेऊन झाडीत शिरायचे.. कारवीच्या रानातून traverse आहे पण वाट जरा जोखमीची आहे,काही ठिकाणी घसारा तीव्र आहे,कारवीचा आधार घेत आपण किल्ल्याच्या सपाटी वर पोहचतो.. किल्ल्याच्या उत्तर भागा पर्यंत पोहचण्या करता तीन टेकड्या पार कराव्या लागतात.शेवटच्या टेकडी च्या आधी दोन पाण्याच्या टाक लागतात,एक माती ने बुजलेली आहे तर दुसरी एका संस्थेने माती पूर्ण काढून टाकली आहे.त्यात आता पाणी उपलब्ध असते.बाजूलाच गावकऱ्यांनी देवाची घुमटी विटा रचून बनवली आहे.तिसऱ्या टेकडी वर कारवीच्या झाडी मध्ये घराचे अवशेष दिसून येतात ,है पाहून आपण उत्तर बाजूच्या झेंडा बुरुजावर पोहचतो.
इथून आपण कुठून कुठवर आलो चा परिसर नजरेस भरतो.
मढे घाट-आंबेणाल-गोप्या घाट-सुपे नाळ व शिवथर घळ परिसरचे देखील दर्शन होते. वातावरण clear असलेलं की घाटावरील आपल्याला राजगड-तोरणा किल्ले दिसतात.किल्ल्याच्या उत्तर भागा खाली न्हावणी सुळका देखील आहे.अशी आपली कावळ्या किल्ल्याची गड फेरी अर्ध्या दिवसात पूर्ण होते.
Comments
Post a Comment