Posts

नाणेघाट रक्षक जीवधन किल्ला

Image
        जुन्नर मधील रम्य सकाळ             जुन्नर चे किल्ले           जीवधन दुर्ग            छत्रपती शिवरायांचा जिथे जन्म झाला अश्या पावन जुन्नर तालुक्यात भटकण्यासाठी असंख्य स्थळ आहेत..  शिवनेरी-चावंड-हडसर-निमगिरी-सिंदोळा-जीवधन असे दुर्ग शृंखला इथेच जुन्नरला लाभली आहे. तर कित्येक लेणी समूह तुळजा-अंबा आंबेलीक-शिवनेरी-लेण्याद्री- नाणेघाट सुद्धा आहेत,कुकडी नदी जिथे उगम पावते असे चावंड किल्ल्या जवळ असलेले  कुकडेश्वर मंदिर सुद्धा पाहण्या सारखे आहे.. असा इतिहास  संपन्न प्रदेशात फिरण्या करता आम्ही जीवधन किल्ला निवडला.. नाणेघाट जवळ आता बरेच हॉटेल्स झाले आहेत.एका हॉटेल जवळ गाडी पार्क करून सकाळी  ८.३०ला गड चढायला सुरुवात केली. १०-१५मिनिटाच्या सपाटी नंतर वाट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात शिरते.इथवर आपल्याला किल्लयाचा पश्चिम भाग व वानरलिंगी सुळका ठळक दिसत असतो.वाटेत आम्हाला बिबट्याची विष्टा सुद्धा दिसली जी १-२ दिवस जुनी असेल. जीवधनच्या पाहिऱ्या व नाणेघाट वानरलिंग...

वरंधा घाटचा रक्षक अपरिचित कावळ्या किल्ला

Image
                     सह्याद्रीत  खूप  प्रमाणात दुर्लक्षित किल्ले आहेत... नेहमीच्या किल्ल्याच्या भटकंती टाळून अश्या अडवाटेवरच्या किल्ल्यांची भेट घेत दुर्गजागर राबता ठेवायला हवा... असाच एक किल्ला आहे कावळ्या किल्ला जो ब्रिटिशांनी विभाजुन कोकणात उतरण्या करता (भोर-महाड)वरंधा घाट तयार केला आहे...हा  किल्ला करायचा असेल तर अर्धा दिवस सुद्धा पुरतो.. घाटा मुळे किल्ल्याचे विभाजन उत्तर व दक्षिण बाजू अशी झाली आहे.        वरंधाच्या पवार हॉटेल पासून ५ मिनिटे डाम्बरी रस्त्याने चालल्यावर  एक वाट डावी कडे वळते आणि झाडीत शिरते... पुढे चालून गेलं की सपाटी मैदानावर ८ खांब  टाक्याचा समूह आहे. जनावरांना पिण्याकरता चर खोदला आहे.पुढे चालत गेल की गडाची वाघजाई  देवी मंदिर व दगडात कोरलेलं पाण्याचं भांड लागते.मंदिराची डाग डुजी करून tiles बसवले आहेत.अजून थोडं पुढं गेलं की दक्षिण बाजूचे शेवटचे टोक लागते,उत्तर बाजूचे किल्ल्याचे व वरंधा घाट चे सुंदर दृश्य इथून दिसते,इथून खाली उतरण्या करता दक्षिण बाजूला पाहिऱ्...

सालोटा दुर्ग सफर... (उत्तरार्ध)

Image
                                            साल्हेरचे दहा दरवाजे अजून ही शाबूत आहेत,शिलालेख युक्त दरवाजे असलेला पूर्ण सह्याद्रीमध्ये तरी साल्हेर सारख अलौकिक दुर्ग नाही... डोलबारी रांगेत साल्हेर दुर्गाचा भाऊ आहे सालोटा किल्ला ,सालोटा केल्या शिवाय ह्या परिसराची भटकंती पूर्ण होत नाही... उंचीला साल्हेर पेक्षा थोडा कमी जरी असला तरी सालोटा भटकंती साठी चांगलंच दमवतो..पूर्व पश्चिम पसरलेल्या ह्या किल्ल्याला प्रवेश मात्र दक्षिण बाजूने आहे.. साल्हेरच्या वाघांमबे खिंड जवळील दरवाज्या पासून दिसणारा सालोटा आणि त्याच्या खांद्या वर असलेली मुंगी समान दिसणारे माणस               साल्हेर पाहून वाघांमबे खिंडीत पोहचलो होतो,सूर्य डोक्यावर नाचु लागला होता,एक वाजले होते,साल्हेर वर सात तासाची रपेटी मुळे पायाला गोळे आले होते,पण पुढचा किल्ला नाक वर करून आमच्या कडे बघत होता  जसा कुणी पैलवान हातावर हात ठेवून जवळ बोलावतोय ,डॉक्टर व भावदास किमान 10...