नाणेघाट रक्षक जीवधन किल्ला
जुन्नर मधील रम्य सकाळ जुन्नर चे किल्ले जीवधन दुर्ग छत्रपती शिवरायांचा जिथे जन्म झाला अश्या पावन जुन्नर तालुक्यात भटकण्यासाठी असंख्य स्थळ आहेत.. शिवनेरी-चावंड-हडसर-निमगिरी-सिंदोळा-जीवधन असे दुर्ग शृंखला इथेच जुन्नरला लाभली आहे. तर कित्येक लेणी समूह तुळजा-अंबा आंबेलीक-शिवनेरी-लेण्याद्री- नाणेघाट सुद्धा आहेत,कुकडी नदी जिथे उगम पावते असे चावंड किल्ल्या जवळ असलेले कुकडेश्वर मंदिर सुद्धा पाहण्या सारखे आहे.. असा इतिहास संपन्न प्रदेशात फिरण्या करता आम्ही जीवधन किल्ला निवडला.. नाणेघाट जवळ आता बरेच हॉटेल्स झाले आहेत.एका हॉटेल जवळ गाडी पार्क करून सकाळी ८.३०ला गड चढायला सुरुवात केली. १०-१५मिनिटाच्या सपाटी नंतर वाट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात शिरते.इथवर आपल्याला किल्लयाचा पश्चिम भाग व वानरलिंगी सुळका ठळक दिसत असतो.वाटेत आम्हाला बिबट्याची विष्टा सुद्धा दिसली जी १-२ दिवस जुनी असेल. जीवधनच्या पाहिऱ्या व नाणेघाट वानरलिंग...