|
जुन्नर मधील रम्य सकाळ |
|
जुन्नर चे किल्ले |
|
जीवधन दुर्ग |
छत्रपती शिवरायांचा जिथे जन्म झाला अश्या पावन जुन्नर तालुक्यात भटकण्यासाठी असंख्य स्थळ आहेत.. शिवनेरी-चावंड-हडसर-निमगिरी-सिंदोळा-जीवधन असे दुर्ग शृंखला इथेच जुन्नरला लाभली आहे. तर कित्येक लेणी समूह तुळजा-अंबा आंबेलीक-शिवनेरी-लेण्याद्री- नाणेघाट सुद्धा आहेत,कुकडी नदी जिथे उगम पावते असे चावंड किल्ल्या जवळ असलेले कुकडेश्वर मंदिर सुद्धा पाहण्या सारखे आहे.. असा इतिहास संपन्न प्रदेशात फिरण्या करता आम्ही जीवधन किल्ला निवडला.. नाणेघाट जवळ आता बरेच हॉटेल्स झाले आहेत.एका हॉटेल जवळ गाडी पार्क करून सकाळी ८.३०ला गड चढायला सुरुवात केली.
१०-१५मिनिटाच्या सपाटी नंतर वाट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात शिरते.इथवर आपल्याला किल्लयाचा पश्चिम भाग व वानरलिंगी सुळका ठळक दिसत असतो.वाटेत आम्हाला बिबट्याची विष्टा सुद्धा दिसली जी १-२ दिवस जुनी असेल.
|
जीवधनच्या पाहिऱ्या व नाणेघाट |
|
वानरलिंगी सुळका |
जंगलाची वेडी वाकडी वाट आपल्याला किल्ल्याच्या पाहिऱ्या पर्यंत नेऊन सोडते.इथून वर डोकं केलं की सुळका आपल्या नजरेस पडतो.पुढे पाहिऱ्यांचं अंतर काही वेळेत संपते आणि डाव्या बाजूला एक घळ सुरू होते,इथे पाहिऱ्या थोड्या तुटलेल्या अवस्थेत आहेत ,जपून हा टप्पा पार केला की एक ८-९फुटाचा रॉक patch आपली वाट पाहत उभा असतो.एक बर इथं support साठी दोर लावले आहेत ,तो धरत वणारयुक्त्या करून आपण गडाच्या कल्याण दरवाज्या समोर येऊन पोहचतो,सूर्य चंद्र कळस कोरलेल्या हा दरवाजा गायमुखी पद्धतीने बांधला आहे.जेने करून शत्रूला दरवाज्या बद्दल कळू नये.
दरवाजातुन वर चढून गेलं की किल्ल्याची कोकण बाजू लागते व पूर्वेला वणारलिंगी/खडा पारशीचे (सुळका) दर्शन घडते. किल्ल्याच्या मधोमध उंचवटा (बालेकिल्ला) जो किल्ल्या ला दोन भागात विभागते, कोकण बाजू व घाटघर बाजू.
|
दोन उध्वस्त समाध्या |
|
जिवाई देवी |
इथून पुढे वर चढत गेले की २ उध्वस्त समाध्या लागतात,त्याच्या पुढे जिवाई देवीचे ठाणे लागते,इथून वाट घाटघरच्या बाजूला उतरते,उतरताना वाटते दारू कोठार लागते,ज्यात एकात एक असे ५खोल्या आहेत.अजून खाली उतरले की सपाटी लागते,ह्या वर पाण्याच्या टाक्यांचा समूह लागतो ,किल्ल्याच्या दक्षिण बाजूस घाटघर दरवाज्या कडे जाणारी वाट आहे,थोड्या पाहिऱ्या उतरले की गुहा लागते,ज्यात पाणी साचले असते.किल्ल्याच्या दक्षिण बाजू तटबंदी पाहायला मिळते.
|
घाटघरच्या वाटेवर असलेली गुहा |
|
घाटघर बाजू |
|
जीवधन च्या दक्षिण बाजू ने दिसणारा बालेकिल्ला |
|
दक्षिण बाजू ची तटबंदी |
|
डोंगर भटके मित्र मंडळी
|
आशा प्रकारे गडाची दोन्ही बाजुु फिरूूून झाली की आपली गड भ्रमनती पूर्ण होतेे .
Comments
Post a Comment