सालोटा दुर्ग सफर... (उत्तरार्ध)

             

           
                  साल्हेरचे दहा दरवाजे अजून ही शाबूत आहेत,शिलालेख युक्त दरवाजे असलेला पूर्ण सह्याद्रीमध्ये तरी साल्हेर सारख अलौकिक दुर्ग नाही... डोलबारी रांगेत साल्हेर दुर्गाचा भाऊ आहे सालोटा किल्ला ,सालोटा केल्या शिवाय ह्या परिसराची भटकंती पूर्ण होत नाही... उंचीला साल्हेर पेक्षा थोडा कमी जरी असला तरी सालोटा भटकंती साठी चांगलंच दमवतो..पूर्व पश्चिम पसरलेल्या ह्या किल्ल्याला प्रवेश मात्र दक्षिण बाजूने आहे..
साल्हेरच्या वाघांमबे खिंड जवळील दरवाज्या पासून दिसणारा सालोटा आणि त्याच्या खांद्या वर असलेली मुंगी समान दिसणारे माणस



              साल्हेर पाहून वाघांमबे खिंडीत पोहचलो होतो,सूर्य डोक्यावर नाचु लागला होता,एक वाजले होते,साल्हेर वर सात तासाची रपेटी मुळे पायाला गोळे आले होते,पण पुढचा किल्ला नाक वर करून आमच्या कडे बघत होता  जसा कुणी पैलवान हातावर हात ठेवून जवळ बोलावतोय ,डॉक्टर व भावदास किमान 100m पुढे होते, त्यामुळे थांबायला वेळ नव्हता... ,पाठीवर बॅग असल्या मुळे माझी न धुमाळ सर ची गती मंदावली होती तरी सालोट्याची आडवी वाट जवळ केली.इथून पुढचा टप्पा पूर्ण करकरीत उन्हात होता,वाटेत थोडं गवत व झाडी होती,पण त्याने सावली काय पडणार नव्हती... डोळे वर करून पाहिले तर काळ्या पाषाणात सालोटा.थोडं पुढून वाट डावी कडे चढू लागली.धुमाळ सर च्या मागे मी पण चालत होतो.पुन्हा वाट डावी कडे वळण घेत एका स्क्री च्या ट्रॅव्हर्स वर पोहचली.. पायाखालची माती पावसात वाहून गेली होती,उरली होती भूष भूषित माती,ती पण आपल्याला खाली घेऊन जाते की काय असे वाटत होतं.

                त्यात एका दुसऱ्या ग्रुपचा भला मोठा ट्रेककर आमच्या चौघांच्या मधोमध येऊन थबकला .. आधीच त्याचे वजन 100kg च्या वर आणि पाठीवर बॅग सुद्धा ,है असलं अवघड गणित अवघड जागी!! वाटाड्या ने व आम्ही त्याला कस बस तो ट्रॅव्हर्स क्रॉस करून दिला आणि पुढे लागलेल्या कातळ पाहिऱ्या वर सावलीत विसावा घेयायला सांगितले.. खूप दमला होता तो.. तिथे त्याला थांबवून आम्ही पुढे सरसावले.. आणि सालोट्याचा कातळ कोरीव  पहिला दरवाजा लागला,चौकटीवर छान अशी फुलांची नक्षी काम केलेले.. म्हणजे समृद्धीचे प्रतीक... आतून मात्र हा दरवाजा मोठं मोठ्या दगड धोंड्यानी भरला आहे, पुढे किल्ल्याचं पोटात कातळ तासून बनवलेली वाट दुसऱ्या दरवाज्या जवळ नेऊन ठेवते.. हा दरवाजा पहिल्या दरवाज्या पेक्षा भन्नाट,डावी कडे दिसतो बागलाण ची शान साल्हेर आणि  समोर हा सुबक दरवाजा... आतून वरच्या बाजूला पहारेकरांसाठी झोपण्या करता जागा आहे,दोन पहारेकरी निवांत झोपू शकतील.. पण ही बाब बाहेरून कळत नाही.. डॉक्टरानी इथे भरपूर फोटो काढून घेतले..
सालोटाचा दुसरा दरवाजा (बाहेरील बाजू)

दरवाज्याच्या 




                  पुढे उजवी कडे एका मागे एक पाण्याचे टाक लागतात ,आणि वाट उजवी कडे वळून किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्या जवळ येऊन थांबते,हा दरवाजा एका भिंती मागे लपवला आहे,आतून गस्त घालणाऱ्यांसाठी बसण्या करता दगडात कट्ट्या सारखी जागा बनवली आहे.पाहिऱ्या चढून गेलो की किल्ल्याचा विस्तार लागतो,वाटेत दोन तीन टाक लागतात,आणि किल्ल्याच्या पूर्व टोकाला हनुमानाची सुरेख मूर्ती लागते जी पूर्वेला तोंड करून आहे.. भावदास सोबत आम्ही देवाच्या पाया पडलो .. आणि सुखरूप किल्ला उतरून जाण्याची प्रार्थना केली... पूर्व बाजूचे डोंगर रांग पाहून परतीची वाट धरली..











       
 पुन्हा वाघामबे खिंडीत येऊन आम्ही भावदास च्या गावात पोहचलो सालोटा वरून गावात यायला आम्हाला दीड तास लागला






















Comments

Popular posts from this blog

हरिहरगडचा थरारक अनुभव

वरंधा घाटचा रक्षक अपरिचित कावळ्या किल्ला