सालोटा दुर्ग सफर... (उत्तरार्ध)
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhO76Y1ZetxJk8F_0wRS0S8Pu2T0F2p4eDmU8go_9hoU6MFIlp4swdQ-eHKjJde8uJ_c7oGFMnCSZhr_5O8kDdgromCdMa77BjvNnRC-sSQmkCsz-hpOq7fH4MiKBPS3K7OtemH_vJcreg/s640/pencil_sketch_1578824146716-01.jpeg)
साल्हेरचे दहा दरवाजे अजून ही शाबूत आहेत,शिलालेख युक्त दरवाजे असलेला पूर्ण सह्याद्रीमध्ये तरी साल्हेर सारख अलौकिक दुर्ग नाही... डोलबारी रांगेत साल्हेर दुर्गाचा भाऊ आहे सालोटा किल्ला ,सालोटा केल्या शिवाय ह्या परिसराची भटकंती पूर्ण होत नाही... उंचीला साल्हेर पेक्षा थोडा कमी जरी असला तरी सालोटा भटकंती साठी चांगलंच दमवतो..पूर्व पश्चिम पसरलेल्या ह्या किल्ल्याला प्रवेश मात्र दक्षिण बाजूने आहे.. साल्हेरच्या वाघांमबे खिंड जवळील दरवाज्या पासून दिसणारा सालोटा आणि त्याच्या खांद्या वर असलेली मुंगी समान दिसणारे माणस साल्हेर पाहून वाघांमबे खिंडीत पोहचलो होतो,सूर्य डोक्यावर नाचु लागला होता,एक वाजले होते,साल्हेर वर सात तासाची रपेटी मुळे पायाला गोळे आले होते,पण पुढचा किल्ला नाक वर करून आमच्या कडे बघत होता जसा कुणी पैलवान हातावर हात ठेवून जवळ बोलावतोय ,डॉक्टर व भावदास किमान 10...