कावळ्या घाटाचा रक्षक कोकणदिवा किल्ला
देशा वरून रायगड च्या घाट वाटांवर लक्ष देण्याकरता जसे लिंगाणा-कावळ्या किल्ला आहेत तसेच कोकणदिवा देखील आहे.. कावळ्या घाट सुद्धा किल्ल्याचा पोटातून जातो.. त्या मुळे हा किल्ला स्वराज्य च्या दृष्टीने खूप महत्व पूर्ण आहे..
मी, डॉ संग्राम इंदोरे व भूषण शिंदे दादा असे आम्ही तिघे वर्षाच्या शेवटच्या रविवार किल्ल्या कडे निघालो,पहाटेच एकत्र निघालो...आमची गाडी खडकवासला ला मागे टाकत पानशेत धरणाच्या फुगवट्या पासून उजव्या बाजूने जाऊ लागली... खडकवासला पासून किल्ला 70किमी आहे.. वळणा वळणा च्या वाटेवर हळू हळू काळोख नाहीसा होत होता आणि सह्याद्रीच्या माळ राणावरची हिरवाई फुलुनी येत होती,वाटेत उंच डोंगर ,छोटे मोठे गाव,पानशेत जलाशय व काही नवीन बांधकाम वाले वीकएंड रिसॉर्ट दिसत होतं... हे पाहता पाहता गाडी मध्ये सह्याद्रीतील अतिक्रमण/commercialization बद्दल संवाद चालू होता...
दापसारे गावं नंतर,घोळ गाव लागते..त्या आधीच डावी कडे एक फाटा फुटतो ,हा कच्चा रस्ता थेट कोकनदिवाच्या पायथ्याला पोहचवतो..गावचे नाव गारजाईवाडी. कच्चा गाडी रस्ता खराब आहे,पण भूषण दादा सारखा निष्णात गाडी चालक सोबत होता त्या मुळे हा रस्ता फुफाटा उडवत पार केला आणि गावात पोचलो... किल्ल्याची वाट विचारून घेतली..
गाव तस छोटच,किरकोळ घर,नवीन माणस पुण्यात कामाला... किल्ल्या वर भटकंती करण्या करता पण भटकी public कोणी नव्हती .. असा हा offbeat कोकणदिवा..
गावातून चालत दक्षिणेकडे निघालो... वाट किरकोळ ते दाट झाडीतून जाते.. त्या नंतर एक छोटी खिंड लागते... तिथून खाली उतार लागतो.. आणि मग आपल्याला प्रथम दृष्टीस पडतो कोकणदिवा दुर्ग... आकाराने लहान ,त्या वर भगवा दिमाखात डौलत असतो,किल्ला पूर्व पश्चिम पसरला आहे,त्या वरून एक डोंगर सोंड खाली उतरली आहे,आपल्या ला त्या दिशेला जायचे असते... गावातून आपण अर्धा तास चाललेले असतो... आणि एका मोकळ्या व प्रशस्त पठारावर येऊन पोहचतो ..
मनात विचार आला camping साठी एकदम बेस्ट जागा...इथेच अलीकडे डाव्या बाजूला देवाची लहान दगडात कोरून बनवलेली घुमटी आहे,आत देव वगैरे नाही पण नव्याने देव ठेवले आहेत, देशावरील व कोकणातील(संदोशी गाव)लोक इथे घरातील शुभ कार्यचा वेळी भेट देत असतात कारण इथे चक्क लग्न पत्रिका ठेवली होती,जी संदोशी गावची होती पण लग्न मात्र गुजरात मध्ये होते,असो ह्या घुमटी वर चर्चा करून आम्ही इथला पठार परिसर निहाळत बसलो...
पठार लागण्या आधी डावी कडची देवाची दगडी घुमटी |
समोर खोल दरी,सर्वीकडे शांतता, वाऱ्या सुद्धा वाहत नव्हता.. दरीतून वानरांचा व पक्ष्यांचा सुरेख आवाज येत होता.
डॉ नी आवाज mobile मध्ये record करून घेतला..मी मोबाईल मध्ये भूषणदादाचा फोटो काढला.. आणि किल्ल्याची वाट शोधू लागलो तिथेच झाडीच्या अलीकडे दगड जमिनीवर रचून arrow बनवला आहे,ही वाट धरून आम्ही किल्ला चढू लागलो,20मिनिटाच्या खडी चढाई ने नको नको केले,त्यात वारा सुद्धा वाहत नव्हता, गर्द कारवी होती,सकाळची वेळ त्यामुळे उन्हाची झळी तशी लागत नव्हती पण दमछाक खूप झाली होती,डोकच काम करत नव्हतं..
थांबत-विसावा घेत हा टप्पा पार केला आणि आम्ही दुर्गाच्या बालेकिल्ल्या खाली असलेल्या गुहे पाशी पोहचलो,इथे थांबून पाणी पिऊन घेतलं... हि गुहा एकदम ऐस-पैस,स्वच्छ, मुक्काम करण्या करता परफेक्ट.. 10-12 माणस तर आरामात विसावू शकतील.. गुहे च्या थोडं पुढे गेल की पिण्याचे पाणी असलेले खांब टाके लागते...ती पाहून आम्ही बालेकिल्ल्या कडे निघालो...
बालेकिल्ल्याकडे जायला किरकोळ कातळ चढाई करावी लागते.. त्या नंतर किल्ल्याचा माथावरची सपाटीवर येऊन पोहचलो.. माथा लांबीने जेमतेम १००मी असेल,तुरळक दगड धोंडे,पूर्वेला उतरण्या करता दगडा मधून वाट करत उतरावे लागते, गड माथ्यावर तसे काही अवशेष नाही मात्र किल्ल्याच्या पूर्व बाजूचा कावळ्या घाट,गाजरेवाडी खिंड, दूरवर कावळ्या-बवळ्या खिंड,त्या पलीकडे दूरवर लिंगाणा,सांदोशी गाव आणि कोकणात धुक्यातुन डोकं वर करून पाहणारा स्वराजयची राजधानी रायगड असे अलौकिक नजारा डोळ्यात कैद करून घेतला..
किल्ल्याच्या पूर्व टोकाला जमिनीत भोक केली आहेत,ज्यात जुन्याकाळी किल्ल्यावरील सैनिक-मावळे उन्हा पासून बचावासाठी मांडव उभे करत असे.
१०-१५मीं वर थांबून गुहे पाशी आलो.. आणि भूषणदादा ने सोबत आणलेला खाऊ गिळंकृत केला, फार भूक लागली होती..
आता कुठे अकरा वाजले होते,आणि पूर्ण गड सुद्धा पाहून झाला होता,एकदम आटोपशीर आणि महत्वपूर्ण किल्ला..
गड उतरू लागलो,तीव्र उतार असल्यामुळे सावकाश उतरलो,उतरताना कारवी चा support घेत उतरलो त्या मुळे घसारा असलेली वाट सोप्पी वाटली.. आणि पाऊण एक तासात गारजाईवाडीत पोहचलो..आणि पुण्याकडे रवाना झालो...
नेहमी प्रमाणे अप्रतिम लेखन🤟
ReplyDelete👌👍👍👍
Delete