सह्याद्री मस्तक साल्हेर!!!
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3kSg4TyAny9qXVGQuP8psHI8tOCfGS_yIj6IPisMq8YoJp_on5sWJllluXnqiKGUZrimnNAlKE94B-OkEmmg4tfsx8wITpMyQZe4cCy8hyphenhyphenkyVGbm4qcJYa_IU7bxZ2XtkpshtmOggzhw/s400/IMG_20191215_001628-01-01.jpeg)
पूर्वार्ध ट्रेक सोबती ^संग्राम इंदोरे- Dr फ्रॉम वाघोली ^धुमाळ सर फ्रॉम शिक्रापूर ^मनोज भालेगरे आणि रवींद्र शेडगे(डोंगरयात्रे चे म्होरके)Guest apperence) ^आणि मी रणधुरंधर फ्रॉम United States of Wagholi Emirates बुद्रुक "इतिहास मत पुछो" Dr आणि धुमाळ सर दोघे घोरत झोपले होते,ह्यात मला काय झोप शिवणार.इतक्या लांब रात्र भर गाडी चालवत आल्यावर हे असच होणार होत,गाडी मधून किल्ल्या कडे जाण्याची वाट विचारण्या करता उतरलो...सकाळ चे सहा वाजले होते,पण वाघामबे गावात कुणी दिसेनासे झाले,फक्त कोंबड्यांची आरोळी एकु येत होती.आणि जी मला थंडी ने घेरले ,गप गाडी मध्ये येऊन बसलो,त्यात डॉक्टरांना जाग आली, म्हणाले आपण साल्हेरवाडीतुन जाऊ,म्हंटल ओके,साल्हेरवाडीत पोहचलो, तिथं राजगड हॉटेल आहे,गाडी पार्क करून नाश्ता करून घेतला,बरेच भटकी लोक येऊन पोहचले होते,मुंबई,नाशिक,पुणे ... मनोज दादा,आणि रवी सुद्धा त्यांचा डोंगरयात्रा ग्रुप घेऊन आले होते...