आज काल सोबत भटकायला लोक टाळाटाळ करायला लागले आहेत,मला आणि Dr. संग्राम इंदोरे ह्यांना कुणी भेटलेच नाही ... मोहिमेचा किल्ला होता नाशिकचा हरिहरगड.. बर असो .. मग आम्ही दोघे शनिवारी उशिरा रात्री इंदोरेंच्या गाडी मध्ये नाशिक कडे रवाना झालो.. डोळे चोळत चोळत -वाटेत आधी मधी चहा पीत अंधारातच नाशिक गाठले.
एक डिसेंबर Aids day म्हणुन साजरा केला जातो त्यामुळे नाशिक मध्ये अगदी पहाटे पहाटे मॅरेथॉन ची तयारी जोरा शोरात सुरू होती.. गूगल बाईला हरिहर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव हर्षेवाडीची वाट सुचवण्यास सांगितले.. आणि त्र्यम्बकेशवर पासून सापगाव फाट्यावर गेल्यावर गुगलबाई गडबडली ना भो... नेमकं गूगल बाईने भलतीच वाट दाखवली,मधेच ट्राफिक ची चिन्हे सुद्धा दर्शवू लागली ,ते पण सकाळ चे चार वाजता.. असो ,पुन्हा त्र्यम्बकेशवरला येऊन वडाप वाल्यानं नेमकं फाट्या वरून कुठली वाट धाऱ्याची ती सांगितली.पुन्हा फाट्यावर येऊन पाहिलं तर तीन रस्ते जातात त्या मध्ये मधली गाडी जाईल अशी कच्ची वाट धरली पुढे गेल की ती वाट डाम्बरी लागली.. (इथे हर्षेवाडी चे board लावले आहेत,अंधार असल्या मुळे दिसले नाही)आणि मग गुगल बाई ने वाट बरोबर दाखवली.. आणि हरिहरगडच्या पायथ्याचे गाव म्हणजे टाकेहर्ष /हर्षेवाडीत पोहचलो,एका घरा जवळ गाडी लावली आणि तास भर विश्रांती केली.
|
हर्षेवाडीच्या तलावाचा परिसर,समोर ब्रम्हा डोंगर आणि हरिहरगड |
सह्याद्रीच्या मुख्य रांगे पासून, इगतपुरीच्या उत्तरेस आणि नाशिक च्या पश्चिमेस त्र्यम्बक रांग पसरली आहे. ही रांग उतवड-बसगड-फणी-हरिहर-ब्रम्हा-ब्रम्हगिरी()-अंजनेरी- रांजनगिरी असे दुर्ग शृंखलेने नटला आहे.त्र्यम्बकेश्वर मुळे इथल्या परिसरात भाविक लोकांचा राबता वर्षभर असतो.नाशिक चा हा किल्ला प्रत्येक भटक्यांच्या मनात घर करून बसलेला आहे,आणि त्याचे कारण म्हणजे किल्ल्याच्या 80degree मध्ये कोरलेल्या सुरेख पाहिऱ्या..
मी आणि Dr आम्हा दोघांना सोडून इथे कुणीही नव्हते ,तर आम्ही दोघानी भरपूर फोटो काढून घेतले आणि पाहिऱ्या चढू लागलो,प्रत्येक पाहिरी वर खोबन बनवली आहे,ती धरून पाहिऱ्या लिलया चढता यते आणि आपला किल्ल्यात प्रवेश एका दरवाज्यातून होतो.हा दरवाजा दगड रचून बनवला आहे,मागे फिरून पाहिलं तर आपण इथवर कसे पोहचलो ते आठवते.. खालून अजून मंडळी वर येताना दिसले आणि भानावर आलो,इथे उजवी कडे कातळात मारुतीराया आणि गणपती बाप्पा कोरले आहेत.
|
प्रत्येक पाहिरी वर असणारी खोबन |
|
पहिला प्रवेश द्वार |
|
तिसरा प्रवेश द्वार आणि कातळात उंच पाहिऱ्या |
इथून पुढे गेल की वरती कमी उंची ने असलेलं छप्पर व डावी कडे दरी असा मार्ग लागतो,तोल सांभाळत आणि वाकून पुढे सरकत राहायचे की पुन्हा लागतात ते डावी कडे कातळात चढलेल्या पाहिरया.इथून खाली पाहिले तर मनात धडकी भरते कारण खोल दरी...आणि एक टप्पा out.खोबन धरून लक्ष पूर्वक हा टप्पा पार करायचा व पुढे कातळ कोरीव दुसरा प्रवेशद्वार लागतो.अजून गुढघ्याभर मोठे काही पाहिऱ्या चढले की लागतो किल्ल्याचा शेवटचा दरवाजा जो विटांनी रचून बनवला आहे.
|
मारुतीराया |
|
बांधीव तळ,व त्या बाजूला असलेले नंदी आणि शिवलिंग |
वर आले की लागतो तो किल्ल्याचा पठार,इथे एका झापे जवळ आम्ही पाणी पिलो.वाटेत काही तहान लागली नव्हती.इथवर आलो ते ८.३०वाजले होते.मग आम्ही गडफेरी सुरू केली.किल्ल्यावर एक मोठं बांधीव तळ आहे,त्याच्या बाजुला मारुतीचे मंदिर आहे,१०-१२ टाकी आहेत ,काही तग धरून आहेत तर काही मातीत बुजलेली आहेत,किल्ल्या च्या पूर्वी बाजूस आले की दारू कोठार ,आणि त्या बाजूला खडकात खोदलेले टाक लागतात. पलीकडे सुद्धा एक छोट तळ लागते.आणि आपण येऊन पोहचतो ते किल्ल्याच्या पूर्वी बाजूस.
|
दारू कोठार,किल्ल्यावरील एकमेव उभी वास्तू |
|
किल्ल्यावरील पश्चिम बाजूचे तळे |
|
किल्ल्यावरील उंच टेकडी,दारू कोठार जवळील टाक |
इथुन समोर ब्रह्मा डोंगर दिसतो,त्या वर देवीचे मंदिर आहे,गावची लोक ह्या डोंगरावर जात असतात,जाण्याची घळीची वाट सुद्धा स्पष्ट दिसते.दुरवर ब्रम्हगिरी डोंगर आणि त्याला जोडलेला दुर्ग भांडर सुद्धा दिसते.आम्हाला इथे बराच वेळ ५ते ६ गिधाड दिसले.नाशिकच्या बरेच उंच कडेच्या किल्ल्यावर हमखास दिसतात.निदान नाशिक मध्ये तरी गिधाड त्यांचं आयुष्य टिकवून आहेत..परत मागे फिरलं की किल्ल्याचा उंच भाग लागतो जो किल्ल्याच्या मधोमध आहे,थोडं कडा चढून गेलं की किल्ल्याचा पठार व त्या वरील सर्व भाग-वास्तु निहाळता येतो.किल्ला पूर्व पश्चिम पसरला आहे.
|
Dr. इंदोरे यांनी टिपलेला Long billed Vulture.. |
|
पश्चिमेचा ब्रम्हा डोंगर-त्याच्या उजवी कडे लांब असलेला ब्रह्मगिरी |
हळू हळू किल्ल्यावर गर्दी वाढत होती.नाशिक-मुंबई अश्या भागातून रविवार असल्या मुळे लोक किल्ल्याला भेट देण्यास आली होती.पावसाळ्यात ह्या किल्लाच्या कातळ पाहिऱ्यावर गर्दी वाढते ,काही विपरीत दुर्घटना होऊ नये ह्या कारणा मुळे किल्ला भटकंती साठी बंद ठेवतात.आम्ही किल्ला उतरायला घेतला.आमच्या नंतर तब्बल २०० च्या वर लोक किल्ल्यावर आली होती .उतरताना पायऱ्यावर गर्दी मध्ये सावकाश उतरावे लागते.वाटेत एका झापे वर आम्ही सोबत आणेलेला जेवण करून घेतलं.. लिंबू सरबत पिऊन ताजे तवाने झालो. हर्षेवाडीत पोहचायला आम्हाला १२ वाजले आणि हरिहरची दुर्ग भ्रमंती संपली.पुण्यात रिटर्न आम्ही सांयकाळी ७ला पोहचलो.
|
हरिहर किल्ल्याचा route मॅप,पायथ्याचे गाव हर्षे वाडी |
मस्तं, खूप छान मांडणी केली आहे! अभिनंदन
ReplyDeleteभन्नाट वर्णन केलयस बंड्या... लगे रहो...
ReplyDeleteजबरी✌️😍
ReplyDeleteVishay blog
ReplyDelete