पूर्वार्ध
ट्रेक सोबती
^संग्राम इंदोरे- Dr फ्रॉम वाघोली
^धुमाळ सर फ्रॉम शिक्रापूर
^मनोज भालेगरे आणि रवींद्र शेडगे(डोंगरयात्रे चे म्होरके)Guest apperence)
^आणि मी रणधुरंधर फ्रॉम United States of Wagholi Emirates बुद्रुक
|
"इतिहास मत पुछो" |
Dr आणि धुमाळ सर दोघे घोरत झोपले होते,ह्यात मला काय झोप शिवणार.इतक्या लांब रात्र भर गाडी चालवत आल्यावर हे असच होणार होत,गाडी मधून किल्ल्या कडे जाण्याची वाट विचारण्या करता उतरलो...सकाळ चे सहा वाजले होते,पण वाघामबे गावात कुणी दिसेनासे झाले,फक्त कोंबड्यांची आरोळी एकु येत होती.आणि जी मला थंडी ने घेरले ,गप गाडी मध्ये येऊन बसलो,त्यात डॉक्टरांना जाग आली, म्हणाले आपण साल्हेरवाडीतुन जाऊ,म्हंटल ओके,साल्हेरवाडीत पोहचलो, तिथं राजगड हॉटेल आहे,गाडी पार्क करून नाश्ता करून घेतला,बरेच भटकी लोक येऊन पोहचले होते,मुंबई,नाशिक,पुणे ... मनोज दादा,आणि रवी सुद्धा त्यांचा डोंगरयात्रा ग्रुप घेऊन आले होते,भेट झाली. पुर्वीकडे सुर्याजीराव सुद्धा जागे झाले आणि आम्ही ७.१५ला गड चढाई सुरू केली.
|
"हे असलं फ्रेम आपण सोडत नसतोय" |
किल्ल्याकडे जाणारी वाट एकदम मळलेली.. अधी मधी दगडावर चुना लावून दिशा दर्शन केले गेले आहे. हळू हळू वाट चढत उंच होत होती.दम पण खूप लागत होता.थोड्या वेळात कातळात खोदीव पाहिऱ्या लागतात.ही वाट डावी कडे नेत असते,पण आपली नजर मात्र असते उजवी कडे वळते. त्या अजस्त्र सह्याद्रीमस्तकाच्या शेल कड्या कडे आणि त्या वर विराजमान दिसते परशुरामाचे मंदिर. एकतर आधीच दमलेलो पण हे असलं काही दृश्य पाहून मनात धास्तीच भरते. डॉक्टर ने बराच पुढे पल्ला गाठला होता.मी व धुमाळ सर त्यांच्या मागे मागे पोज देत,कड्याचा फोटो काढत चालेलो.
|
वाटेतून दिसणारा साल्हेरचा शेळकडा |
|
डोंगरयात्री मनोजदादा.. "एकदम फिट माणूस" |
थोड्या वेळाने डावी कडे एक तटबंदी दिसू लागते,जी एका भल्या मोठ्या बुरुजापासून सुरू होते.जो पर्यंत आपण बुरुजा जवळ येत नाही आपल्याला त्या मध्ये लपलेला पूर्वाभिमुख दरवाजा दिसत नाही. डॉक्टर व आम्ही इथे फोटो काढून घेतले,आता इथून पुढे सपाटी लागते,थोडं पुढे गेल की अजून दोन दरवाजे लागतात जे एका मागे एक आहे,छान नक्षी काम केली आहे .एकीचे पुर्वीकडे तोंड आहे तर दुसऱ्याचे उत्तरे कडे,दोन्ही दरवाजाचा वर जाण्यास वाट आहे.जेणे करून पहारेकरी गस्त घालू शकतील .हा area तटबंदी बांधून बंदिस्त केला गेला आहे.
|
डॉक्टरांना म्हंटल "No kit lens only 10-22" |
|
धुमाळ सर,त्या मागे डॉक्टर आणि त्या मागे कातळ भिंती वर तटबंदी |
|
अवाढव्य बुरुज आणि त्यात लपलेला दरवाजा |
|
डॉक्टर in action,एकदम बारकाईने फोटो काढत |
|
दुसरा दरवाजा आणि तिसरा दरवाजा |
|
तिसरा दरवाजा आतील बाजू |
|
दुसरा दरवाजा |
इथे एक गावचा माणूस "भावदास" खालून येऊन भेटला.विचारपूस केली तर म्हंटला की फोन आला होता.काही लोक वाट चुकली आहे.म्हंटल इथे काय चुकण्या सारख.एकदम साधा माणूस,अशी लोक इथेच सह्याद्रीच्या पायथ्याशीच राहणारी. डॉक्टर त्याच्या सोबत फास्ट मध्ये पुढे गेले आणि आम्ही टंगळ मंगळ करत मागे मागे.आपलं असच तर असत भो .
|
वाटेत भेटलेला भावदास... पूर्ण ट्रेक सोबती |
वाटेत डावी कडे एक तळ लागत.बाजूला दोन पादुका दगडात कोरून ठेवले आहेत .हे सगळं पाहून काढता पाय घेतला,तशी तर ही एक माचीच आहे,आजू बाजूला बऱ्याच घरांचे अवशेष-ज्योत दिसतात.जुन्या काळी इथे लोक वस्ती असणार.तद नंतर वाट तुरळक वनश्री ने सजली आहे.आणि त्यातून बाहेर पडलो की समोर पुन्हा गड चढाई सुरू होते,पुन्हा दगडात पाहिऱ्या ते संपले नाही तेच समोर उभे टाकले एका मागे एक अश्या तीन सरस दरवाजा.असे बनवले आहेत की जो पर्यत जवळ येत नाही दरवाजा काय दिसत नाही.सर्व दरवाजे दगडाने रचून बनवले आहेत.इथून गडाखालची गाव सुंदर दिसतात.आणि सह्यदरा पलकडील गुजरातचे डांग जिल्हा जो सूर्यनारायणाच्या उजेडात न्हाऊन निघत होता.
|
माचीवरील पाण्याचे टाके |
|
चढाई चा दुसरा भाग |
|
किल्ल्याचा चौथा दरवाजा,जाण्याकरता कातळ टप्पा |
|
सलग लागलेलं दरवाजा |
|
किल्ल्याचा सहावा दरवाजा |
आता कुठं दहा वाजले होते,डोंगरयात्रा चे सर्व मंडळी पुढे निघून गेले होते आणि किल्ल्याचा main पठार सुरू झाला होता.किल्ल्यावरून काही गुजराती पब्लिक खाली उतरत होती...... केम छो? मजमा छो केलं ?
bluetooth वरती जाम मोठयाने गाणी लावून उतरत होती,आणि शांत वातावरण भग्न करत होती.असो.... Ignore.
|
यज्ञ कुंड |
|
Night trekker आणि कातळात असलेलं गुहा |
पुढे एक भल मोठं यज्ञ कुंड होत.त्या बाजूला आहे एक पाण्याचं टाक. चालत चालत आम्ही किल्ल्याच्या गुहांपाशी येऊन पोहचलो.. एकदम 3BHK caves म्हणा. गुहां मध्ये पावसाचे पाणी जाऊ नये ह्या करता वरून चऱ्या खोदल्या आहेत.राहण्या करता किल्ल्या वरती एकमेव आणि बेस्ट जागा.एक ग्रुप इथे थांबला होता.. पालघर चे Night trekker.. रात्री त्यांनी मटण बटाटा बिर्याणी बेत केला होता.. म्हंटल मज्जानु life आहे यांची .ह्या गुहा समोर एक भला मोठा बांधीव तलाव आहे.. मधोमध एक उभा खांब आहे.पाण्याची level मोजण्या करता उभा असेल असे मला वाटते,दुसरं काय प्रयोजन असेल समजत नाही.जवळच देवीचे मंदिर देखील आहे. इथला परिसर पाहून आम्ही थोडं biscuit-चिवडा खाऊन घेतला ,पाणी पिलो.
|
किल्ल्या वरील टेकडी आणि त्या वरील परशुराम मंदिर |
|
परशुराम शिखर ,मंदिर व भाविक आणि भटके |
गुहे समोर तोंड करून उभे राहिले तर उजवी कडून एक वाट गड माथ्यावर जाते.अर्ध्या तासाच्या चाली नंतर आपण सपाटी वर पोहचतो आणि समोर दिसते एक टेकडी व त्या वर पुर्वीकडे तोंड केलेले परशुरामाचे मंदिर. आणि हेच ते मंदिर जे पायथ्यापासून खुणावतो. हेच परशुराम शिखर जे आहे महाराष्ट्रच्या किल्ल्या मधील सर्वात उंच शिखर.आम्ही इथे पोहचलो तर मनोज दादा,रवी आमच्या साठी खाण्याचा डबा घेऊन थांबले होते.त्यांचा डबा आणि आमचा डबा असा एकत्र करून Dr, धुमाळ सर ,भावदास आणि मी जेवण करून घेतल.ग्रुप फोटो झाला.इतक्या उंची वर दुसऱ्यांदा आल्याचे समाधान वाटले.
|
मनोज भालगेरे,धुमाळ सर,डॉक्टर इंदोरे |
|
किल्ल्याच्या गुहे समोर असलेले भलं मोठं तलाव |
ह्या आधी 2012 ला बोंबी सोबत.तेव्हा इथले साल्हेर-सालोटा-मोरा- हरगड-मुल्हेर-मांगीजी-तुंगीजी दुर्ग शिखर केले होते.आठवणींना उजाळा मिळाला.
इथून पूर्वीकडचा सालोटा दुर्ग आणि त्या मागे डोलबारी पर्वत रांगेचे विहंगम दृश्य बेस्ट दिसते.वातावरण पोषक असेल तर सातमाळा रांग सुद्धा दिसते स्पष्ट दिसते.
इथे जरा वेळ काढून पाय उतार झालो.पुढे गुहे पासून पूर्वेला वाट जाते.वाटेत घरांचे अवशेष,एक हनुमानाची तुटलेली मूर्ती वगैरे वास्तू दिसतात.थोडं पुढे वाघामबे च्या दिशेला एक दरवाजा लागतो. तो उतरून वाट सालोटाच्या दिशेला जाते.इथून पुढचा मार्ग कातळ कोरून बनवला आहे, उजवी कडे पाण्याचे टाक लागतात.त्यात काही टाक जुन्या काळी धान्य कोठार म्हणून सुद्धा वापरत असतील पण त्यात आता पाणी साचले आहे.हा सगळा प्रकार संपला की सालोटाच्या दिशे कडे तोंड करून एक दरवाजा उभा आहे. डॉक्टर ,धुमाळ सरांसोबत इथे भरपूर फोटो काढेल कारण फ्रेमच आम्हाला अशी भेटत होती.खालून काही पुण्याची मंडळी आली.ह्यांनीच वाट चुकल्यामुळे भावदासला फोन करून बोलवले होते,पण सोबत त्यांच्या अजून एक खालचा गावकरी होता.म्हणजे त्यांनी दोघाना बोलवलं होत,जो येईल तो देव माणूस.असो...
|
सातवा दरवाजा |
|
कातळ तासून केलेली वाट आणि टाक |
|
आठवा दरवाजा त्या मागे दिसतो तो सालोटा दुर्ग व वाघांमबे परिसर |
|
खिंडीत येऊन टाकणारी घूडघ्या भर मोठ्या पाहिऱ्या |
|
शेवटचा दरवाजा |
|
साल्हेर वरून उतरणारी वाट,भावदास आणि सालोटा |
|
सालोट्या कडे रवाना |
पुढे खाली उतरण्यास कातळात पाहिऱ्या सुरू झाल्या आणि गडाचा नऊवा आणि दहावा दरवाजा लागला.पुढे वाट अजून थोडी पुढे जाऊन डावी कडे वळते आणि खाली सालोटा साल्हेरच्या खिंडीत उतरते एवढं सर्व खटाटोप करून आम्ही साल्हेर किल्ला फत्ते केला.. थकवा खूपच जाणवत होता पण पुढे दिसत होता अजस्त्र-महाकाय Pyramid च्या आकाराचं सालोटा!!!!!!!
|
GPS route साल्हेर-सालोटा
Total trek -12.50km
【सालोटा प्रवास पुढच्या भागात】 |
नेहमी प्रमाणे अप्रतिम लेखन.
ReplyDeleteलिहित रहा, फिरत रहा, फिट रहा 😍