|
कोरीगड व क्षितिजा वरील सुर्योदय |
सह्याद्रीच स्वप्न उशाशी बाळगुन जगल की आपली सकाळ सूर्यनारायणच्या दर्शनाने होते... मी , डाँ. संग्राम इंदोरे, मनोज दादा भालेगरे व त्यांचा चौथीत शिकत असलेला मुलगा संग्राम भालेगरे असे आम्ही चौघे पुण्यातुन लोणावळा च्या दिशेने पहाटे पहाटे डाकटरांच्या गाडी मध्ये कुच केली...तसा हा प्लॅन वैभवजी पवार ह्यांनी ठरवलं होता पण काही कारणास्तव त्यानी वेळेत काढता पाय घेतला 😏😏😏
|
संग्राम आणि त्या मागे
नवरा नवरी सुळके |
उजेडल नव्हतं तेच लोणावळ्यात पोहचल्यावर भुर्जी पाव आणि चहा वर ताव मारला ... नोव्हेंबर महिना सुरू झाला होता पण अजून लोणावळ्यात सुद्धा थंडी जाणवत नव्हती.. गप्पा मारत आम्ही लोणावळ्यातील पर्यटनस्थळांना मागे टाकत 8 वाजता घनगडच्या पायथ्याचे गाव एकोले गाठलं.
बॅगेत पाण्याची bottle घेतली आणि किल्ल्याकडे चालूं
|
घनगड पायथ्यापासून |
लागलो..घनगड वर जायला चांगली मळलेली वाट आहे... म्हणजे एक्सप्रेस हायवेच ,काय कुठं चुकुन पण चुकण्याचे चान्सेस नाहीत... अर्धी वाट छान जंगळातुन जाते..त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही .. पण थोडी दमछाक जरूर होते जी माझी झाली होती कारण वाट थोडी चढणीची आहे.मनोज दादा जोमात पुढाकार घेत होते.. मागून डाँ आपल्या Dslr ने अधुनमधून जे दिसेल त्याची बारकाईने फोटो काढत होते.. संग्राम निवांतपणे जंगलाचे सोंदर्य निहाळत चालत होता.. थोड्या चाली नंतर आम्ही उजव्या बाजूला असलेल्या
|
गारजाई देवी मंदिर |
|
गारजाई देवी |
गारजाई देवीच्या मंदिरापाशी पोहचलो... मंदिरात गारजाई देवीची मूर्ती,मंदिराच्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला रंगरंगोटी केलेल्या शिलालेख आहे..मंदिर समोर दिपमाळ, वीरगळ देखील आहे.. छोटी विश्रांती घेऊन आम्ही पुढे चालु लागलो... नंतर एक वाट डावी कडे जाते आणि एक वाट किल्ल्याच्या पूर्वभिमुख दरवाज्या कडे... डावी वाट धरून आम्ही पुढे गेलो तर एक खिंडी लागते ज्यात निसर्ग निर्मित दगडी मचान बनली आहे ज्या वर तोळ सांभाळत मनोज दादा परिसर निहाळत होते...इथून थोडं वर चढले की डावी कडे एक traverse गडाच्या पोटाला चिकटून पुढे जाते जिथे एक गुहा आहे..जुन्या काळी मावळे इथून टेहाळणी करत असावे...
|
Route Map घनगड साठी |
पुन्हा मूळ किल्ल्याच्या वाटे वर येऊन आम्ही गड प्रवेश केला.. लगेच समोर प्रशस्त गुहा लागतात जिथे रात्री मुक्काम करता येऊ शकतो.. इथून उजवी कडे एक मोठा कातळ किल्ल्याच्या भागातून तुटून बाहेर पडला आहे आणि किल्ल्याचा आधार घेऊन उभा आहे जेणे करून एक नेसर्गिक कमान तयार
|
पूर्वाभिमुख प्रवेश |
झाली आहे.इथून पुढे गेल की कातळात डावी कडे देवीची मूर्ती ठेवली आहे .इथून पुढे काही पाण्याच्या खोदीव टाक आहेत...पुन्हा
मागे आले की किल्ल्याच्या माथ्यावर जायला एक मजबूत शिडी उभी केली आहे.ती आम्ही एक एक चढून वर आलो..इथून पुढे दगडात कोरीव पाहिऱ्या आहेत त्यातल्या काही कालांतराने नष्ट झाल्या आहेत ,परंतु जागो जागी लोखंडी दोर लावला आहे ज्याच्या मदतीने गड गाठायला सोपं होतं.. वर जातात जातात तीन चार
|
मुख्य डोंगरामधून
तुटलेला कडा |
पाण्याच्या टाक्या वर गुहा सुद्धा लागते आणि आपण नष्ट झालेल्या दुसऱ्या प्रवेश द्वारा जवळ पोहचतो इथून डावी कडे एक बुरुज आहे ज्या वर भगवा डोलत उभा आहे ... पुढे गेलो की पाण्याचे दोन मोठे टाक दिसतात.. इथून थोडं पुढे उत्तरे कडे गेलं की तैल बैल डोंगर नजरेस पडतो आणि पूर्ण परिसर निहाळता येतो.. गड फेरी मारत असताना पश्चिमे कडे सुधागडाचा पूर्ण किल्ला दिसतो.. गड फेरी मारत येत असताना शेवटी एक मोठा बुरुज दिसतो ज्यात तोफा साठी जग्यां आहेत..गड माथा जास्त मोठा नाही त्या मुळे किल्ला सुद्धा कमी वेळात पूर्ण पाहून आम्ही खाली उतरलो...
|
घोरपड |
गड उतरत असताना आम्हाला एक सूंदर घोरपड दिसली जी कातळावर चढत होती.. डॉक्टरांनी तिचे बरेच फोटो व विडिओ काढले,ती सुद्धा बरेच पोज देत होती ... पुढे मुख्य दरवाज्या पासून खाली उतरलो...
घनगड उतरण्यास जेमतेम 15 ते 20 मिनटं लागली असतील...आता दहा वाजले होते, गड उतार होऊन पाणी पिलो आणि गाडीत बसलो व कैलासगडच्या पायथ्याचे गाव वडुस्ते च्या मार्गी लागलो..
|
तैलबैला व सुधा गड आणि खोल दऱ्या |
|
बलेकिल्ल्या वरील झेंडा बुरुज |
घनगड उतरण्यास जेमतेम 15 ते 20 मिनटं लागली असतील...आता दहा वाजले होते, गड उतार होऊन पाणी पिलो आणि गाडीत बसलो व कैलासगडच्या पायथ्याचे गाव वडुस्ते च्या मार्गी लागलो.. ह्या गावी जाण्याकरता लोणावळा बाजुने तामन्ही घाटा कडे जाणाऱ्या रस्त्यात पिंपरी फाटा लागतो जिथे दिशा दर्शक फलक लावला आहे ज्या वर "कैलासगड कडे" लिहले आहे ,तो रस्ता धरला की आपण वडुस्ते गावात जातो,किल्ल्यावर जाणारी वाट अजून थोडी पुढे खिंडीच्या पलीकडे आहे.. झाडा खाली गाडी पार्क करून खाद्य सामग्री-कॅमरा घेऊन उजवी कडे किल्ल्याकडे तोंड करून चढाई सुरू केली..
|
संग्राम आणि कैलासगड सुरवात |
|
Dr.संग्राम इंदोरे |
पुढे lead ला मीच होतो,वाट जरा अंगावर येणाऱ्या चढाई ची होती.. असे दोन डोंगर क्रॉस करून वाट एका खिंडी मध्ये येते व उजवी कडे डोंगर ठेऊन वाट डावी कडे कारवी मध्ये शिरते... असे अजून एक दोन डोंगर पार करून वाट उजवी कडे झाडीत वळते..वाटेत चालत असताना मला आणि इंदोरे डॉकटराना तरी डरकाळी सारखा आवाज आला आणि आम्ही एकमेकांना confirm सुद्धा केले पण मनोज दादा आणि संग्रामला असले काही ऐकू आले नाही म्हणाले, इतक्यात ऊन डोक्यावर आले होते,थकवा जाणवत होता,पोटात कावळे बावळे होऊन ओरडत होते म्हणून वाटेत असलेल्या झाडाच्या सावली मध्ये थोडी विश्रांती करून आणलेला शिधा पोटात ढकलला आणि पुन्हा वाटेला लागलो..आणि गडमाथा गाठला...किल्ल्यावर येण्याकरता आम्हाला जेमतेम दोन तास लागले..
|
गड माथा, पठार व मधोमध झाडीयुक्त उंच टेकडी |
माथ्यावर गवत तुफान माजले होते ... झेंड्याची जागा सोडली तर सर्वी कडे तेच दृश्य, किल्ल्याच्या पूर्वी बाजूस मुळशी धरण व त्या मागचा पाण्याचा निळाशार फुगवटा दिसत होता...
|
महादेवाचे मंदिर |
|
मनोज दादा आणि उत्तरेकडील परिसर |
थोडी फोटो graphy करून आम्ही किल्ल्याच्या विरुद्ध बाजूस जायला निघालो.. तेच खालून दोन मूल आली आणि पाण्या करता विचारू लागले,मनोज दादा ने त्यांना पाणी देऊ केले आणि विचारपूस केली,ते म्हणाले अजून सुद्धा त्यांचे मित्र आले आहेत पण ते अर्ध्यावरतीच थांबले होते व ह्यांनी daring केली आणि वर आले.. मग ह्यांना सोबत नेऊन पुढे जाण्यास निघालो..
|
उतरताना किल्ल्याचा पठार व मुळशी धरण बॅकवॉटर |
किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या टेकडी च्या डावी कडून पुढे आले की काही घरांच्या अवशेष आढळतात ,थोडं पुढे महादेवाचं मंदिर आहे ज्यात एक शिवलिंग उघड्यावर आढळते... तिथल्या झेंड्याला भगवा लावून मनोज दादा व आम्ही परत फिरलो तर वाटेत आम्हाला बिबट्याची scat दिसली जी काही दिवस जुनी होती,आम्ही ह्याचा अर्थ असा लावला की वाटेत खरच बिबट्या दबा धरून बसला होता.
आम्ही मागे बघितले तर ती मूल सुद्धा खाली निघून गेली होती,पाण्याची टाक शोधण्याचा प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही,बहुदा वाट झाडीत लुप्त झाली असावी, असा हा आटोपशीर कैलासगड offbeat असून जास्त लोकांचा इथे वावर नाही आणि इथून पूर्ण मुळशी व आजू बाजुच्या प्रदेश दिसतो... आता खाली येताना तीव्र उतार लागत होता,तोल सांभाळत व कारवीचा आधार घेत आम्ही आजचा दुसरा किल्ला फत्ते करून उतरलो,आणि मुळशी मार्गे पुण्यात आलो..
|
किल्ल्यावरील रान फुल |
|
कैलासगड route मॅप |
तळटीप - सर्व फोटो मोबाइल द्वारे काढले आहेत
मस्तं विशाल खूप छान लिहिलं आहेस. असाच फिरत रहा, अन लिहीत रहा...😍🤘
ReplyDelete👍👌
Delete